मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 एप्रिल 2020 (22:16 IST)

आनंद महिंद्रांच्या कँटीनमध्ये प्लेटऐवजी केळीचे पाने

करोना विषाणूने सध्या संपूर्ण देशात थैमान घातला आहे अशात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे सध्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत आहे. अशा काळात देशातील मोठंमोठाले उद्योगपती आपआपल्या परीने मदतीचा हात पुढे करत आहे. अशात आनंद महिंद्रा नेहमी आदर्श म्हणून ओळखले जातात. हल्ली त्यांचा मोठेपणा तेव्हा दिसून आला जेव्हा केळी उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांनी आपल्या कंपनीतील कँटीनमध्ये प्लेटऐवजी केळ्याच्या पानांचा वापर सुरु केला.
 
ही माहिती आनंद महिंद्रानी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी एका निवृत्त पत्रकाराने मेलद्वारे ही कल्पना सुचवली असे सांगितले आहे. 
 
आनंद महिंद्रा यांच्या या कार्यचं नेटकर्‍यांनी भरभरुन कौतुक केलं आहे.