बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (12:40 IST)

1 तासाभरात ही थाळी संपवा, नवी बुलेट जिंका

याला खवय्यांसाठी एक सुवर्णसंधी असेच म्हणावे लागणार आणि त्यातून जर आपल्याला रॉयल एन्फिल्ड बुलेटची आवड असेल तर मग नक्कीच हे चॅलेज आपल्यासाठी फायद्याचे ठरेल.
 
पुण्यातील एका रेस्टॉरंटने एक थाळी एक तासभरात संपल्यावर चक्क बुलेट जिंकण्याची ऑफर दिली आहे. वडगाव मावळमधील शिवराज हॉटेलने विराट ‘बुलेट थाळी’ एका तासात संपवा आणि बुलेट बाईक जिंका अशी ऑफर दिली आहे. 
 
हॉटेल मालकांनी आपल्या हॉटेलबाहेर ५ नव्या बुलेटही उभ्या केल्या आहेत. या ऑफर अंतर्गत सुमारे 1 लाख 65 हजार रुपयांची बुलेट ‍जिंकण्यासाठी आपल्याला भव्य थाळी तासभरात फस्त करावी लागेल. बुलेट थाळीची किंमत ४ हजार ४४४ रुपये इतकी आहे. या ऑफरमुळे हॉटेलला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे.
 
आतापर्यंत सोलापूर रहिवासी सोमनाथ पवार बुलेट थाळी स्पर्धेचे विजेते ठरले आहेत. त्यांनी चार किलो वजनाची थाळी एका तासाच्या आत फस्त केली.
 
यापूर्वी आठ किलोची रावण थाळी चौघांनी 60 मिनिटात संपवण्याचं आव्हान शिवराज हॉटेलमध्ये होतं. विजेत्याला पाच हजार रुपयांचं रोख पारितोषिक मिळणार होतंच, शिवाय विजेत्यांना थाळीसाठी एक रुपयाही मोजावा लागणार नव्हता.
 
काय आहे बुलेट थाळी डबल चॅलेंज
या थाळीत तब्बल बारा पद्धतीच्या वेगवेगळ्या डिश आहेत. हे पदार्थ तयार करण्यासाठी चार किलो मटण आणि मासे वापरले जातात. 55 जण ही थाळी तयार करतात.
 
बुलेट थाळी मध्ये पापलेट, सुरमई, चिकन लेग पीस, कोलंबी करी, मटन मसाला, चिकन फ्राय, कोळंबी बिर्याणी, भाकरी, रोटी, सुकट, कोलंबी कोळीवडा, रायता, सोलकडी, रोस्टेड पापड, मटण अळणी सूप एवढे पदार्थ देण्यात येत आहे.