बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 25 नोव्हेंबर 2019 (12:10 IST)

राम भक्त हनुमानाने फुलपाखरूत दिले दर्शन, राम मंदिराच्या निर्णयाशी जोडत आहे लोक

अयोध्यामध्ये राममंदिर निर्माण होणार या निर्णयानंतर राम भक्त हनुमानाने फुलपाखरू स्वरूपात दर्शन दिले आहे. हा दावा मध्य प्रदेशातील खंडवा येथील रहिवासी राहुल महाजन यांनी केला आहे.
 
राहुल यांच्याप्रमाणे त्यांचा भाऊ बुरहानपूर येथे राहत असून त्यांच्या घरी हनुमानाने फुलपाखरूत दर्शन दिले आहे. ते म्हणतात की भावाच्या घराच्या भिंतीवर रात्री एक फुलपाखरू दिसलं. जसं जसं फुलपाखरूने आपले पंख पसरवले त्यात हनुमानाची आकृती दिसत होती.
राहुल महाजन यांच्याप्रमाणे ज्याप्रकारे अयोध्यामध्ये राम‍मंदिर निर्माणाची स्वीकृती मिळाली त्यानंतर प्रसन्न होऊन हनुमानाने दर्शन दिले आहे. फुलपाखरूत हनुमानाने स्वरूप बघून सर्व आनंदित झाले आहे. याबद्दल लोकांना कळल्यावर भावाच्या घरी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि पूजा पाठ देखील करण्यात आली.