सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जून 2018 (16:06 IST)

'काला' ची थार आनंद महिंद्रा यांच्याकडे

महिंद्रा ॲण्‍ड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा हे रजनीकांतचे चाहते आहेत. यामुळेच 'काला' चित्रपटात वापरण्‍यात आलेली थार जीप आता महिंद्रा यांच्‍या संग्रहालयाची शोभा वाढवणार आहे. धनुषने ही जीप दिल्‍याचे महिंद्रा यांनी म्‍हटले आहे. महिंद्रा यांनी ट्‍विट करून याची माहिती दिली आहे. 
 
खरं म्‍हणजे, एक वर्षांपूर्वी 'काला' चित्रपटाचा पोस्टर रिलीज झाला होता. त्‍यात, रजनीकांत थार जीपच्‍या बोनेटवर बसलेले होते. आनंद महिंद्रा यांनी ट्‍विट करून ही जीप आपल्‍या संग्रहालयात ठेवण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली होती. यावर रजनीकांत यांचा जावई आणि तमिळ स्टार धनुषने आनंद यांना रिप्लाय देत लिहिलं होतं की, 'शूटिंग पूर्ण झाल्‍यानंतर ही जीप आपणास देण्‍यात येईल.'
 
थार ही महिंद्रा कंपनीची एक पॉप्‍युलर एसयूव्‍ही जीप आहे. ॲडव्‍हेंचर करणारे लोकांच्‍या पसंतीची ही जीप आहे. सव्‍वा सहा लाख रुपये ते साडे नऊ लाखांच्‍या दरम्‍यान, या जीपची किंमत आहे.