शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

काय खरंच राहुल गांधी, राजीव गांधी यांचा मुलगा नाही.. जाणून घ्या सत्य...

लोकसभा निवडणुका जवळ येत असताना सोशल मीडियावर एकमेकांवर हल्ला बोलण्याची गती देखील वाढली आहे. पक्षांचे आयटी सेल आणि समर्थक सुपर अॅक्टिव्ह मोडमध्ये असून विपक्षावर हल्ला बोलत आहे. दुष्प्रचारासाठी फेक न्यूज, फेक फोटो आणि व्हिडिओची मदत घेतली जाते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीं संबंधित एक न्यूजपेपर क्लिप सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हायरल क्लिपमध्ये लिहिले आहे की अमेरिकन डीएनए तज्ज्ञ डॉक्टर मार्टिन सिजो यांनी दावा केला आहे की राहुल गांधी हे राजीव गांधींचे पुत्र नाही.
 
काय आहे व्हायरल क्लिपमध्ये?
यात अमेरिकन डीएनए तज्ज्ञ डॉक्टर मार्टिन सिजो यांनी म्हटले आहे की त्याच्याकडे राजीव गांधी आणि राहुल गांधी यांचे डीएनए असून ते जुळत नाही. डॉ मार्टिन ने हे देखील म्हटले की ते भारतात येऊन याबद्दल पुरावा देऊ शकतात की राहुल हे राजीव गांधींचे पुत्र नाही. काँग्रेसने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पक्षाचे नेते देखील चूप आहेत.
 
व्हायरल पेपर कटिंग शेअर करत लोकांची प्रतिक्रिया

काय आहे सत्य?
आम्ही सोशल मीडियावर या व्हायरल न्यूजपेपर कटिंगची चाचणी केली तर या किल्पबद्दल काही माहिती सापडली नाही. इंटरनेटरवर सर्च केल्यावर देखील यासंबंधित कुठलीही बातमी मिळालेली नाही. एखाद्या डॉक्टरद्वारे असा दावा करणे मोठी बातमी होती आणि असे असल्यास ती बातमी वृत्तपत्र, टीव्ही चॅनल आणि न्यूज पोर्टल्सने नक्कीच कव्हर केली असती.
 
यानंतर व्हायरल बातमी दिलेल्या डॉक्टरचे नाव सर्च केले तेव्हा या नावाचा डॉक्टर असल्याचे आढळले नाही.
 
तपासणीत हा दावा बोगस असल्याचा आणि व्हायरल बातमी फेक असल्याचे आढळून आले.