1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: रविवार, 9 ऑक्टोबर 2022 (14:40 IST)

केरळमध्ये महिलेच्या पोटातून 5 वर्षानंतर कात्री काढली

कोझिकोड येथील रहिवासी केरळमधील 30 वर्षीय गृहिणी हर्षिना हिच्या पोटातून 11 सेमी लांबीची कात्री काढण्यात आली. पाच वर्षांनंतर तिला पोटातील असह्य दुखण्यापासून आराम मिळाला. 2017 मध्ये तिसर्‍या प्रसूतीसाठी कोझिकोड मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये आल्यावर त्रास सुरू झाल्याचे तिने सांगितले.
 
हर्षिना म्हणाली, माझे 30 नोव्हेंबर 2017 रोजी सिझेरियन झाले. त्यानंतर माझ्या पोटात वारंवार दुखायचे. अनेक सल्ला आणि उपचार करूनही माझी वेदना कमी झाली नाही. जेव्हा मला वेदना असह्य वाटल्या तेव्हा मी पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेले आणि सीटी स्कॅन केल्यानंतर मला सांगण्यात आले की माझ्या पोटात धातूची वस्तू आहे. नंतर मला सांगण्यात आले की ती कात्री होती.ऑपरेशन दरम्यान चूक झाली त्याच हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर तिच्या पोटातील कात्री काढण्यात आली.
 
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पीडित महिलेने आता मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांच्याकडे तक्रार केली आहे.
 
Edited By - Priya Dixit