गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (13:51 IST)

मासे खाणारी बकरी(शेळी) चा व्हिडीओ व्हायरल,पाहणारे आवाक झाले

सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.काही तर मजेशीर असतात.तर काही असे असतात की त्याच्यावर विश्वासच बसत नाही.काही लोक असे असतात ज्यांना डोळ्याने बघून देखील विश्वास होत नाही.आपण शेळींना गवत खाताना आणि स्वतः मटणाच्या स्वरूपात इतरांचा आहार बनताना बघितले आहे.पण आपण अशी शेळी बघितली आहे का की ती मांसाहारी आहे.याचे उत्तर नकारार्थीच असणार.
 
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे,त्यात आपण एका मांसाहार करणाऱ्या शेळीला बघू शकता.हा व्हिडीओ इंस्टाग्रामसह इतर प्लॅटफॉर्म वर देखील पाहायला मिळत आहे.
 
या व्हिडिओमध्ये एक शेळी टोपलीतून मासे काढून चावताना दिसत आहे.या मांसाहारी शेळीने सर्वांना आश्चर्यात टाकले आहे.आपण या पूर्वी शेळीला गवत,पालेभाज्या खाताना पहिले असणार.परंतु ही शेळीतर आघाडीवर आहे. व्हिडिओ मध्ये ही शेळी आरामात आणि आनंदात मासे खातांना दिसत आहे.
 
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला हजारो लोकांनी बघून त्यावर आपले कॉमेंट्स दिले आहे.की कलियुगात आता असेच दिवस बघायचे होते.एका युजर्स ने लिहिले आहे की प्रथमच मटणाला मासे खाताना बघत आहे.एका ने लिहिले आहे की मी प्रथमच अशी शेळी बघितली आहे.लोक या व्हिडिओला शेअर करत आहेत.