सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 14 नोव्हेंबर 2018 (09:08 IST)

तर अमेरिकेन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इतिहास घडेल

अमेरिकेन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इतिहासात पहिल्यांदाच एका हिंदू महिलेचं नाव पुढे येत आहे. हवाईच्या विद्यमान खासदार तुलसी गबार्ड २०२० मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याची दाट शक्यता आहे. 
 
लॉस अँजिलीसमध्ये एका कार्यक्रमात अमेरिकेतील सुप्रसिद्ध भारतीय वंशाचे डॉक्टर संपत शिवांगी यांनी गबार्ड यांची भावी राष्ट्राध्यक्ष अशी ओळख करून दिली. यानंतर उपस्थितीतांनी बराच वेळ उभं राहुन टाळ्या वाजवून गबार्ड यांचं अभिनंदन केलं. तुलसी गबार्ड २० वर्ष सक्रीय राजकारणात असून डेमोक्रेटिक पक्षाकडून चार वेळा निवडून आल्या आहेत. डेमोक्रेटीक पक्षामध्ये तुलसी गबाड यांना मानाचं स्थान आहे. सलग चौथ्यांदा निवडून आलेल्या गबार्ड यांचं नाव 2020 च्या निवडणुकीत पुढे केलं जाऊ शकतं.
 
तुलसी गबार्ड या हिंदू आहेत पण त्या भारतीय नाहीत. त्यांचे वडील ख्रिश्चन तर  आई कॉकेशियन समुदायाची आहे. पण  तुलसी यांनी देखील तरुण वयातच हिंदू धर्म स्विकारला आहे.