गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 22 एप्रिल 2024 (09:09 IST)

तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर ३१७ अर्ज वैध

voting machine
राज्यातील लोकसभा निवडणूक २०२४ च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील ११ मतदारसंघात ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल झाले होते. अर्जांची छाननी केल्यानंतर एकूण ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
 
तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रायगड लोकसभा मतदार संघात २१,  बारामती-४६, उस्मानाबाद-३५, लातूर-३१, सोलापूर-३२, माढा-३८, सांगली-२५, सातारा-२१, रत्नागिरी-सिंधुदुर्ग-९, कोल्हापूर-२७ आणि हातकणंगले मतदारसंघात-३२ असे एकूण ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

Edited By -Ratnadeep Ranshoor