गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By

यंदाची निवडणूक ही देशाच्या भविष्याची निवडणूक मोदींना मत द्या – चंद्रशेखर बावनकुळे

chandrashekhar bawankule
मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी काळेवाडी येथे नमो संवाद सभा आणि ओबीसी मेळावा झाला त्यावेळी विकसित भारत करण्यासाठी महायुतीला म्हणजे मोदींना मत देण्याचे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. 
 
या वेळी बोलताना बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या सत्तेत 500 वर्षांपासून चे अपूर्ण राहिलेल्या राम मंदिरांची अयोध्येत स्थापना केली. मोदींनी तिहेरी तलाक पद्धती बंद करून अल्पसंख्यकांतील महिलांना निष्पक्षपणे न्याय दिला. गेल्या दहा वर्षांपासून मोदी सरकारने राष्ट्रहिताचे कार्य केले. तुमचा एक चुकीचा मत देशाचा विकास थांबू शकतो. विकसित भारतासाठी मोदींना मत करावे. मोदी हे युगपुरुष आहे. देशाच्या सीमा भक्कमपणे सुरक्षित करण्याचे काम केले. यंदाची निवडणूक ही देशाच्या भविष्याची निवडणूक आहे.   

भारताचा विकास करण्याचा संकल्प पंतप्रधान मोदींनी केला आहे मोदींना दिलेला मत विकसित भारतासाठी असणार तर तुम्ही दिलेल्या एक चुकीचा मत देशाचा विकास थांबवू शकते. म्हणून मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मत देऊन मोदींना विजयी करा असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी  केले.
 
Edited by - Priya Dixit