बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: सोमवार, 9 सप्टेंबर 2024 (17:02 IST)

गोंदियात भाजपला धक्का, गोपालदास अग्रवाल यांची पक्ष सोडत काँग्रेसमध्ये परतण्याची घोषणा

महाराष्ट्रात वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार असून सर्व राजकीय पक्ष आपापले पक्ष मजबूत करण्याच्या तयारीला लागले आहे. महायुतीच्या घटक असलेल्या भाजपला गोंदियात मोठा धक्का बसला आहे. गोंदिया मतदार संघाचे माजी आमदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपालदास अग्रवाल यांनी भाजप पक्ष सोडून काँग्रेस पक्षात परतण्याचा निर्णय घेतला. गोपालदास यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 
 
गोपालदास अग्रवाल हे गोंदिया विधानसभा मतदार संघातून काँग्रेसच्या तिकिटावर तीनदा आमदार झाले आहे. त्यांनी 2019 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 2019 मध्ये काँग्रेसने त्यांना गोंदिया विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले होते, परंतु उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेच्या 48 तास आधी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मात्र, अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांच्याकडून 25,000 हून अधिक मतांनी त्यांचा पराभव झाला.

2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकालही महाराष्ट्रात भाजपच्या अपेक्षेप्रमाणे झाले नाहीत. गोंदिया भंडारा जिल्ह्यातून अपेक्षेप्रमाणे निकाल लागले नाहीत
गोंदिया भंडारा जिल्ह्यातील अनेक नेते महाविकास आघाडीत सामील होत असून गोपालदास अग्रवाल यांनी गोंदिया विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाचे चिन्ह पंजा हे निवडले असून भाजप पक्ष सोडण्याची घोषणा केली. 
Edited by - Priya Dixit