1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. महाराष्ट्र दिन
Written By
Last Modified: शनिवार, 1 मे 2021 (13:54 IST)

महाराष्ट्र गीत : मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!

Maharashtra Din Song
मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।धृ.।।
 
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा।।
 
अंजनकांचनकरवंदीच्या काटेरी देशा।
बकुलफुलांच्या, प्राजक्तीच्या दळदारी देशा।।
 
भावभक्तिच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा।
शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दाच्या देशा।
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणवरी नाचते करी।।
जोडी इहपरलोकांसी व्यवहारापरमार्थासी
वैभवासी वैराग्यासी।।
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा।।
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।1।।
 
अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी ..... ॥२॥
 
कवी -गोविंदाग्रज
संगीतकार - वसंत देसाई
मूळ गायक - जयवंत कुलकर्णी व समूह