मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: बुधवार, 11 सप्टेंबर 2019 (10:28 IST)

बुधवारी दिग्गज नेते करणार भाजपात प्रवेश

विधानसभा निवडणुका आचारसंहिता काही दिवसात लागू होणार आहे. मात्र काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत राहिलो तर पराभव पक्का असे असल्याने अनेक नेते भाजपात प्रवेश करत आहेत. बुधवारी तर अनेक दिग्गज प्रवेश करणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकानंतर एक धक्का बसणं सुरुच असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांचा नगरसेवकांसह भाजपात प्रवेश होणार असून, सोबतच काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील हे देखील भाजपात दाखल होत आहेत. काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांनी नुकताच पक्षाचा राजीनामा दिल्याने तेही भाजपात बुधवारीच प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बुधवारी आघाडीला जोरदार धक्का बसणार आहे. गणेश नाईक यांनी तर प्रवेशाची जोरदार तयारी केली आहे. राष्ट्रवादीच्या 55 नगरसेवकांसह गणेश नाईक भाजपात प्रवेश करणार आहेत. या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे जोरात तयारी सुरु आहे. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा दुपारी 3 वाजता पक्ष प्रवेश होईल. यापूर्वीच त्यांनी पुढील भूमिका जाहीर करणर आहोत असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणतात तसे खरच का ? विरोधी पक्ष म्हणून कोणी नेता राहणार की नाही असा प्रश्न उभा राहिला आहे.