महात्मा गांधी विशेष :महात्मा गांधींच्या दीर्घ आयुष्याची आणि आरोग्याची 4 रहस्ये, जाणून घ्या

Last Updated: शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (08:05 IST)
अनिरुद्ध जोशी
जर गांधीजींना गोळी घातली नसती, तर ते किमान 5 ते 10 वर्षे जगले असते, म्हणजे त्यांचे वय 85 ते 90 वर्षांच्या दरम्यान असते, असा अंदाज होता, पण ओशो रजनीश यांनी त्यांच्या एका प्रवचनात असे म्हटले होते महात्मा गांधी 110 वर्षे जगले असते. आता त्यांच्या रोगांबद्दल आणि त्यांच्या आरोग्याबद्दल बोलूया .

गांधीजींचे आजार: महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदर येथे झाला. नथुराम गोडसेने गोळी झाडल्यानंतर 30 जानेवारी 1948 रोजी नवी दिल्लीत त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय 79 होते.त्यावेळी ते पूर्णपणे निरोगी होते. त्यांना मधुमेह, रक्तदाब किंवा इतर कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. त्यांना असा कोणताही गंभीर आजार नव्हता पण तरीही त्यांना काही आजार होते.
गांधीजींच्या आरोग्यावर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने प्रकाशित केलेले 'गांधी अँड हेल्थ@150' हे पुस्तक सांगते की, गांधीजी त्यांच्या अन्नाचे अनेक प्रयोग करत असायचे आणि कठोर व दीर्घ उपवास करत असायचे आणि काही झाले तर ते वैद्यकीय मदत घेण्यास संकोच करायचे ज्यामुळे त्याची तब्येत बिघडली होती. या काळात त्यांना बद्धकोष्ठता, मलेरिया आणि प्लुरिसीसह (फुफ्फुसांना सूज येते ) अनेक आजारांनी ग्रासले परंतु त्यांनी त्यावर मात केली. त्यांनी 1919 मध्ये मूळव्याध आणि 1924 मध्ये अपेंडिसिटिसचे ऑपरेशन केले. हे सर्व त्यांच्या वारंवार अन्न बदलण्यामुळे आणि दीर्घ उपवासा मुळे झाले.परंतु त्यांना लवकरच हे समजले आणि त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारला.

1. शाकाहारी आहार आणि व्यायाम: वरील पुस्तकानुसार शाकाहारी आहार आणि नियमित व्यायाम हे त्याच्या चांगल्या आरोग्याचे रहस्य होते. गांधीजींचे चांगले आरोग्य मुख्यतः त्यांच्या शाकाहारी आहार आणि मोकळ्या हवेत व्यायामाला कारणीभूत होते.

2. पायी चालणे: महात्मा गांधी आपल्या आयुष्यात दररोज 18 किलोमीटर चालत असायचे , जे त्यांच्या आयुष्यात पृथ्वीच्या 2 फेऱ्या करण्याइतके होते. पुस्तकानुसार, लंडनमध्ये विद्यार्थी जीवनात, गांधीजी दररोज संध्याकाळी सुमारे आठ मैल आणि पुन्हा झोपण्यापूर्वी 30-40 मिनिटे चालायचे.
3. घरगुती उपचार आणि निसर्गोपचार: या पुस्तकात त्यांच्या दृढ विश्वासाचा उल्लेख आहे की लहानपणी आईचे दूध पिण्याशिवाय लोकांना त्यांच्या दैनंदिन आहारात दुधाचा समावेश करण्याची गरज नाही. त्यांनी गाय किंवा म्हशीचे दूध न पिण्याचे वचन दिले जे घरगुती उपचार आणि निसर्गोपचार यावर त्यांचा विश्वास अधोरेखित करते. आपली पोटाची उष्णता शमवण्यासाठी ते
त्यावर ओल्या मातीच्या पट्ट्या बांधत असे. सुती कापडात ओली काळी माती गुंडाळून त्याला पोटावर ठेवत असे.

4 गीतेचे पालन: असे म्हटले जाते की रोगाची उत्पत्ती सर्वप्रथम मन आणि मेंदूमध्ये असते आणि सकारात्मक विचार रोगाचा उदय थांबवतात. महात्मा गांधींना भगवान महावीर, महात्मा बुद्ध आणि भगवान कृष्ण आवडायचे. ते नेहमी आपल्या सोबत
गीता ठेवायचे. महात्मा गांधींनी महावीर स्वामींचे पंचमहाव्रत, महात्मा बुद्धाचा
आष्टांगिक मार्ग , योगाचे यम आणि नियम आणि कर्मयोग, सांख्य योग, अपरिग्रह आणि गीतेच्या संभावावर त्यांचे तत्त्वज्ञान यावर विश्वास ठेवायचे.मानसिक स्थिती मजबूत करण्यासाठी हे खूप महत्वाचे होते, ज्यामुळे त्याचे शरीर देखील स्वच्छ, शांत आणि निरोगी राहिले.
यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

‘ई-बाईक्स’तपासणीसाठी परिवहन विभागाची विशेष मोहीम; परस्पर ...

‘ई-बाईक्स’तपासणीसाठी परिवहन विभागाची विशेष मोहीम; परस्पर बदल केल्यास कारवाई होणार
विद्युत बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांमध्ये ( ई-बाईक्स) मान्यताप्राप्त संस्थेची परवानगी न घेता ...

रस्ते वाहतूक आणि सुरक्षेसाठी नागपुरात पायलट प्रोजेक्ट; ...

रस्ते वाहतूक आणि सुरक्षेसाठी नागपुरात पायलट प्रोजेक्ट; यशस्वीनंतर देशभर राबविणार
भारतातील रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा ...

आयपीएलः अंतिम सामन्यासाठीचे नियम जाहीर; विजेता याच्यानुसारच ...

आयपीएलः अंतिम सामन्यासाठीचे नियम जाहीर; विजेता याच्यानुसारच ठरणार
इंडियन प्रीमियर लीग २०२२ शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. लीगचे सामने संपले असून आता ४ ...

LSG vs RCB LIVE एलिमिनेटर: रजत पाटीदारचे शानदार शतक

LSG vs RCB LIVE एलिमिनेटर: रजत पाटीदारचे शानदार शतक
LSG vs RCB Live IPL 2022 Eliminator: IPL 2022 चा एलिमिनेटर सामना लखनौ सुपर जायंट्स आणि ...

आम आदमी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी अमित पालेकर यांची ...

आम आदमी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी अमित पालेकर यांची नियुक्ती
गोवा प्रभारी आतिशी यांची घोषणा पणजी : आप पक्ष हा फक्त निवडणूक लढविण्यापुरता मर्यादित ...