बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Modified: शनिवार, 10 फेब्रुवारी 2024 (08:02 IST)

पांडुरंगाची आरती : काय तुझा महिमा वर्णूं मी

काय तुझा महिमा वर्णूं मी ...
काय तुझा महिमा वर्णूं मी किती ॥
नाममात्रें भवपाश पैं तुटती ॥
पाहतां पाऊलें ही श्रीविष्णूमूर्ती ॥
कोटी कुळांसहित जग ते उद्धरती ॥ १ ॥
जय देव जय देव जय पंढरीराया ॥
करूनियां कुर्वंडी सांडीन काया ॥ धृ. ॥
मंगल आरतीचा थोर हा महिमा ॥
आणिक द्याया नाहीं तीस ती उपमा ॥
श्रीमुखासहित देखे जो कर्मा ॥
पासूनि सुटे जैसा रवि नाशी तमा ॥ २ ॥
धन्य व्रतकाळ हे एकादशी ॥
जागरण उपवास घडे जयासी ॥
विष्णूचें पुजन एकभावेंसीं ॥
नित्य मुक्त पूज्य तीन्ही लोकांसी ॥ ३ ॥
न बचे वायां काळ जो तुज ध्याती ॥
अखंड तुझा वास तयांच्या चित्तीं ॥
घालें मुखें सदा प्रेमें डुल्लती ॥
तीर्थे मिळणी वास तयांचा पाहती ॥ ४ ॥
देव भक्त तूंची झालासी दोन्ही ॥
वाढावया सुख भक्ति जनीं जडजीवां उद्धार व्हाया लागोनी ॥
शरण तुका वंदी पाऊलें दोन्ही ॥ ५ ॥