शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 4 डिसेंबर 2021 (19:59 IST)

हिवाळ्यात, कोरडी आणि निर्जीव त्वचा परत ग्लोइंग करण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा

हिवाळा सुरू झाला की आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. हिवाळ्यात थंड हवेमुळे आपली त्वचा आर्द्रता गमावते.अशावेळी त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. आजकाल बाजारात अनेक हिवाळ्यातील विशेष मॉइश्चरायझर्स आणि क्रीम्स उपलब्ध आहेत. पण तुमच्या आहारात काही बदल करूनही सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवू शकता.  हिवाळ्यात चमकदार त्वचा मिळवण्‍यासाठी तुम्‍ही तुमच्‍या आहारात कोणत्‍या गोष्‍टींचा समावेश केला पाहिजे. चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 हिरव्या पालेभाज्या - हिवाळ्यात चमकदार त्वचा मिळविण्यासाठी आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा अवश्य समावेश आवर्जून करा. पालक, मोहरी आणि मेथी यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये ए , सी आणि के जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. व्हिटॅमिन ए त्वचेला मुलायम आणि चमकदार बनवते आणि मुरुमांची समस्या देखील कमी करते. त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्यांमध्ये आयरन , प्रोटीन इत्यादी घटक असतात, जे त्वचा आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. 
 
2 सुका मेवा- सुका मेवा आपल्या आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन्स, आयरन, प्रोटीन, कॅल्शियम आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड सारखे पोषक घटक असतात, जे शरीराला उबदार ठेवण्यास तसेच त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. हिवाळ्यात आपल्या आहारात बदाम, अंजीर, अक्रोड इत्यादींचा समावेश करू शकता. हे सर्व पोषक घटक त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यास आणि त्वचेची सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. 
 
3 मसाले - हिवाळ्यात आले, वेलची, काळी मिरी, मसूर साखर आणि लवंगा यांसारख्या मसाल्यांचा आहारात समावेश करा. हे फक्त हिवाळ्यात शरीराला  उबदारपणा देत नाहीत तर त्वचा चमकदार बनवण्यासाठी देखील फायदेशीर आहेत. यामुळे मुरुम, व्हाईट हेड्स आणि सुरकुत्या यासारख्या त्वचेच्या समस्या दूर होतात आणि मऊ आणि चमकदार त्वचा मिळते. 
 
4 व्हिटॅमिन सी - व्हिटॅमिन सी आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.  ग्लोइंग स्किन मिळवायची असेल, तर आपल्या आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध असलेल्या फळांचा समावेश करा जसे की संत्री, मोसंबी. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि त्वचेच्या संसर्गाचा धोका कमी होतो. यासह, हे फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करते आणि त्वचेची लवचिकता राखते. हिवाळ्यात व्हिटॅमिन सीच्या सेवनाने त्वचा चमकदार आणि सुंदर बनते.  
 
5 संपूर्ण धान्य - हिवाळ्यात आपल्या आहारात बाजरी, नाचणी आणि मका यासारख्या संपूर्ण धान्यांचा समावेश करा. या सर्वांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात आणि ते शरीर तसेच त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. संपूर्ण धान्यामध्ये प्रोटीन , कॅल्शियम, आयरन आणि फायबरसारखे पोषक घटक असतात जे त्वचा निरोगी आणि चमकदार बनविण्यास मदत करतात.