शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By

लिंबाचे 10 चमत्कारिक पण सात्त्विक टोटके

श्रद्धा- अंधश्रद्धेच्या या खेळात आज आपण लिंबाचे काही उपाय बघू. काही लोकं लिंबाचा वापर तांत्रिक कार्यांसाठी करतात पण याचे काही सात्त्विक उपयोगदेखील आहे. येथे आम्ही लिंबाचे असेच काही सात्त्विक प्रयोग सांगणार आहोत जे समाजात प्रचलित आहे.
आरोग्याच्या दृष्टीने लिंबू खूप लाभकारी आहे. पण यात संकट दूर करण्याची ताकतही आहे तर लिंबू आपल्याला धनवानही बनवू शकतं. तर पाहू या लिंबाचे 10 टोटके:
वाईट नजरेपासून बचाव: हा उपाय तर सर्वांना माहीत असेल. अधिकश्या दुकानात हिरव्या मिरच्यांसोबत एक लिंबू लटकवण्यात येतो. हा लिंबू वाईट नजर शोषून घेतो. लिंबाचा आंबट तर मिरच्यांचा तिखट स्वाद वाईट नजर ठेवणार्‍यांची एकाग्रता भंग करतं.

वास्तू दोष दूर करतं: ज्या घरात लिंबाचं झाड असतं तिथे नकारात्मक ऊर्जा सक्रिय असणे अशक्य आहे. या झाडाच्या आजूबाजूचे वातावरण सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असतं. लिंबाचं झाड वास्तुदोष दूर करतं. जर आपल्याकडे झाड नसेल तर एक लिंबू घेऊन त्याला घरातील चारी कोपर्‍यात 7 वेळा फिरवा नंतर एखाद्या एकांत जागेवर जाऊन त्याचे चार भाग करून चारी दिशांकडे एक-एक तुकडा फेकून द्या. तिथून परत येताना वळून पाहू नये.

यश प्राप्तीसाठी: खूप मेहनत घेतल्यावरही यश मिळत नसेल तर हनुमान मंदिरात जाऊन एक लिंबावर चार लवंगा लावा. तिथे हनुमान चालीसा पाठ करा. यश प्राप्तीसाठी प्रार्थना करून लिंबू जवळ ठेवून कार्य आरंभ करा.

 
 

वाईट नजर उतरविण्यासाठी: जर कोणालाही वाईट नजर लागली असल्यास त्याच्या डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळा लिंबू ओवाळा. नंतर याचे चार भाग करून एखाद्या एकांत स्थळी फेकून द्या. मागे वळून पाहू नये.

व्यवसायात लाभ हेतू: व्यवसायात यश प्राप्तीसाठी एक लिंबू दुकानाच्या चारी भीतींना स्पर्श करावा. नंतर लिंबाचे चार भाग करून चारी दिशांमध्ये फेकून द्या. याने दुकानातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन जाईल. हा उपाय किमान 7 शनिवारी करा.

भाग्योदयासाठी: एक लिंबू स्वत:वरून सात वेळा ओवाळून त्याचे दोन भाग करा. उजव्या हातात असलेला तुकडा डाव्या बाजूला तर डाव्या हातात असलेला तुकडा उजव्या बाजूला फेकून द्या.

नोकरीसाठी: एक लिंबावरती चार लवंगा टोचा आणि 'ॐ श्री हनुमते नम:' मंत्राचा 108 वेळा जप करून लिंबू स्वत:जवळ ठेवा. कार्य सुरळीत पार पडेल. 
खूप प्रयत्न केल्यावरही नोकरी मिळत नसेल तर एक डाग नसलेला लिंबाचे चार भाग करून रात्री बाराच्या आधी चौरस्त्यावर जाऊन चारी दिशांकडे लांब फेकून द्या.

रोग मुक्ती हेतू: अनेक उपचार केल्यानंतरही रोग बरा होत नसल्यास शनिवारी एक लिंबू रूग्णाच्या डोक्यावरून सात वेळा उलट दिशेत फिरवा. मग एक चाकू डोक्यापासून पायापर्यंत स्पर्श करत तो लिंबू कापावा. त्याचे दोन भाग करून संध्याकाळी दोन्ही दिशेत फेका. हा टोटका जाणकार मनुष्याला विचारून केल्यास लाभ मिळेल. कारण यात वेळ महत्त्वाची आहे.

किंवा तीन पकलेले लिंबू घेऊन एकाला निळा, दुसर्‍याला काळा तर तिसर्‍याला लाल रंगाच्या शाईने रंगून द्या. आता या लिंबावर एक-एक अख्खी लवंग टोचा. आता तीन मोतीचुराचे लाडू आणि तीन लाल किंवा पिवळे फूल रुमालात बांधून द्या. प्रभावित व्यक्तीवरून सात वेळा ओवाळून एकांत असताना पाण्यात प्रवाहित करा.

संतान प्राप्ती हेतू: हा उपाय एखाद्या जाणकाराला विचारून करा. उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात लिंबाची जड आणून गायीच्या दुधात मिसळून स्त्रीला पाजावे.

समृद्धीसाठी: चौरस्यात्यवर जाऊन एक लिंबू स्वत:वरून सात वेळा ओवाळून त्याचे दोन भाग करा. एक भाग मागे तर एक भाग पुढे फेकून घरी जा.

किंवा एक लिंबं डोक्यापासून पायापर्यंत 21 वेळा ओवाळून विपरित दिशेत फेका. नंतर एक पाणी असलेले नारळ घेऊन स्वत:वरून 21 वेळा ओवाळून एखाद्या मंदिरात चढवून द्या.