बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 13 मार्च 2022 (15:45 IST)

होळीपूर्वी 634 रुपयांना LPG सिलिंडर घरी आणा, बुकिंग त्वरा करा

एलपीजी कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता स्वस्तात गॅस सिलिंडरची सुविधा मिळणार आहे.स्वस्तात गॅस सिलेंडर बुक करू शकता, आणि तेही फक्त 634 रुपयांमध्ये.
 
देशातील सरकारी तेल कंपनी IOCL ने ग्राहकांच्या सुविधा लक्षात घेऊन स्वस्त सिलिंडर आणले आहेत. महागाईच्या काळात हा सिलेंडर फक्त 634 रुपयांना खरेदी करू शकता.
 
या सिलेंडरचे नाव कंपोझिट सिलेंडर आहे. हे 14 किलोच्या सिलेंडरपेक्षा वजनाने खूपच हलके आहे. हा सिलिंडर कोणीही एका हाताने आरामात उचलू शकतो. दिसायलाही खूप सुंदर आहे. घरात वापरल्या जाणाऱ्या सिलिंडरपेक्षा ते 50 टक्के हलके आहे.
 
हे कंपोझिट सिलिंडर वजनाने हलके असतात आणि त्यात 10 किलो गॅस मिळतो. या कारणास्तव, या सिलिंडरची किंमत कमी आहे. या सिलेंडरचे वैशिष्ट्य म्हणजे ते पारदर्शक आहेत.
 
ग्राहक हा सिलिंडर फक्त 633.5 रुपयांमध्ये घेऊ शकता. हा सिलिंडर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेऊ शकता. याशिवाय,लहान कुटुंबासाठी हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. 
 
हा नवीन सिलेंडर पूर्णपणे गंजरोधक आहे. याशिवाय या सिलिंडरचा कधीही स्फोट होणार नाही. हे सिलिंडर पारदर्शक स्वरूपाचे आहेत, ज्यामुळे ग्राहकांना एलपीजीची पातळी पाहणे सोपे जाईल. म्हणजेच त्यात किती गॅस शिल्लक आहे आणि किती संपला हे ग्राहकांना सहज कळू शकणार आहे.