बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

बीएसएनएलची आकर्षक ऑफर, ९९९ रुपयात रोज १ जीबी डेटा

बीएसएनएलने आकर्षक ऑफर आणली आहे. यात ९९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दर दिवसाला १ जीबी डेटा मिळणार आहे, त्याचप्रमाणे सहा महिन्यांसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉल्सही मिळणार आहे. बीएसएनएलची ही ऑफर फक्त जम्मू काश्मीर आणि आसाममध्ये लागू होणार नाही.
 
९९९ रुपयांच्या प्रिपेड प्लानमध्ये ग्राहकांना दरदिवशी १ जीबी डेटा वापरता येणार आहे. त्याचप्रमाणे सुरुवातीचे सहा महिने अनलिमिटेड व्हॉइस कॉल्सही मोफत मिळणार आहे. यात रोमिंग कॉल्सचाही समावेश असणार आहे. या व्यतिरिक्त १८२ दिवसांसाठी दरदिवशी १०० SMS मोफत पाठवता येणार आहेत. सहा महिने झाल्यानंतर मुंबई आणि दिल्लीमधील ग्राहकांना एका मिनिटाच्या व्हॉइस कॉल्ससाठी ६० पैसे मोजावे लागणार आहेत. तर सहा महिन्यांनंतर एसएमएससाठी २५ पैसे मोजावे लागणार आहेत.