मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 24 जानेवारी 2022 (13:52 IST)

खाद्यतेल पुन्हा महागणार !

केंद्र सरकारने आयात शुल्कात कपात केल्याने तेलदरात घट झाली होती पण आता तेलाच्या किमती पुन्हा वर जाण्याची चिन्हे आहेत. आयात महागल्याने तेलदरात वाढीची चिन्हे दिसून येत आहेत.
 
मागील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत मुंबईत खाद्यतेलाचा सरासरी दर 125 ते 135 रुपये प्रति लिटर होता. नंतर आयातीत घसरण झाल्याने मे-जूनदरम्यान सरासरी दर 170-180 रुपये प्रति लिटरच्या घरात गेलं. नंतर आयात शुल्ककपातीमुळे सरासरी दर 150 ते 160 रुपयांवर आले होते. त्यानंतर हे दर 125 ते 140 रुपये प्रति लिटरवर स्थिरावले आहे. पण आता या दरात पुन्हा वाढीची शक्यता आहे.
 
माहितीनुसार केंद्राने आयात शुल्क कमी केले असले तरी आता आयातीत तेलाचे दरच वधारलेले आहे त्यामुळे येत्या काळात खाद्यतेल महागण्याची चिन्हे आहेत.