शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जुलै 2021 (09:22 IST)

Ganesh Chaturthi Special Trains कोकण मार्गावर 72 गणपती स्पेशल गाड्या

गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी सेंट्रल रेल्वेने स्पेशल ट्रेन्सची सोय केली आहे. कोकण मार्गावर 72 गणपती स्पेशल गाड्या सोडल्या आहेत. 5 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्याने विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत.
 
गणोशोत्सव जवळ येत असून भक्तांना गावीकडे जाण्याची ओढ लागते. गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊनचे नियम कडक असल्याने अनेकांना गावी जाता आलं नाही मात्र यंदा नागरिकांना कोकणात आपल्या गावी जाता यावं यासाठी मध्ये रेल्वेने विशेष गाड्यांची सोयी केली आहे. या ट्रेन सीएसएमटी-पनवेल आणि सावंतवाडी रोड, रत्नागिरीदरम्यान चालविण्यात येणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून चालविण्यात येतील. संपूर्ण आरक्षित असलेल्या या गाड्यांचे बुकिंग गुरुवार 8 जुलै रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे. 
 
गणपतीसाठीच्या विशेष रेल्वेचं वेळापत्रक जाणून घ्या-
1. मुंबई सीएसएमटी-सावंतवाडी-मुंबई सीएसएमटी डेली स्पेशल (36 फेऱ्या)
मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी पूर्ण आरक्षित स्पेशल ट्रेन 5 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान दररोज चालवली जाईल. ही ट्रेन रात्री 12.20 मिनिटांनी मुंबई सीएसएमटी येथून रवाना होईल आणि त्याच दिवशी दुपारी 2 वाजता ही ट्रेन सावंतवाडी येथे पोहचेल. त्यानंतर ही ट्रेन सावंतवाडी येथून 2.20 वाजता रवाना होईल तर दुसऱ्या दिवशी पहाटे 4.35 वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहचेल.
 
स्टॉप: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्दा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर थांबेल.
 
2. मुंबई सीएसएमटी-रत्नागिरी-मुंबई सीएसएमटी आठवड्यातून दोनदा (10 फेऱ्या)
मुंबई सीएसएमटी- रत्नागिरी स्पेशल ट्रेन 6 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान मुंबईहून दर सोमवारी आणि शुक्रवार चालवली जाईल. मुंबई सीएसएमटी स्थानकातून दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी ही ट्रेन सुटेल तर त्याचदिवशी रात्री ही गाडी 10.35 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. रत्नागिरीहून पुन्हा ही गाडी 11.30 वाजता मुंबई सीएसएमटीसाठी रवाना होईल तर दुसऱ्या दिवशी 8.20 वाजता पोहचेल. रत्नागिरीहून दर रविवारी आणि गुरुवार 9 ते 23 सप्टेंबर दरम्यान ही ट्रेन चालवली जाईल. 
 
स्टॉप: संगमेश्वर रोड, अरावली रोड, सावर्दा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल आणि दादर स्थानकांवर थांबेल. मुंबईहून सुटणारी गाडी मागील सर्व स्थानकांवर थांबेल आणि ठाणे स्थानकात अतिरिक्त थांबा असेल.
 
3. पनवेल - सावंतवाडी रोड - पनवेल  आठवड्यातून तीनदा (16 फेऱ्या)
पनवेल - सावंतवाडी स्पेशल दर मंगळवार, बुधवार आणि शनिवारी 07 ते 22 सप्टेंबर दरम्यान पनवेल येथून सकाळी 8 वाजता सुटेल तर त्याच दिवशी सावंतवाडी रोडला रात्री 8 वाजता पोहोचेल. सावंतवाडी-पनवेल स्पेशल ट्रेन सावंतवाडी रोड येथून दर मंगळवार, बुधवार आणि शनिवारी रात्री 8.45 वाजता सुटेल दुसर्‍या दिवशी सकाळी 7.10  वाजता गाडी पनवेलला पोहोचेल.
 
स्टॉप: रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्दा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर थांबेल.
 
4. पनवेल-रत्नागिरी-पनवेल द्विसाप्ताहिक स्पेशल (10 फेऱ्या)
पनवेल - रत्नागिरी स्पेशल ट्रेन पनवेल येथून 9 ते 23 सप्टेंबर दरम्यान दर गुरुवार आणि रविवारी सकाळी 8 वाजता सुटेल तर त्याच दिवशी गाडी 3.40 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. रत्नागिरी - पनवेल गाडी 6 ते 20 सप्टेंबर दरम्यान दर सोमवारी व शुक्रवारी रात्री 11.30 वाजता रत्नागिरीहून सुटेल तर दुसर्‍या दिवशी सकाळी 6 वाजता ही गाडी पनवेलला पोहोचेल.
 
स्टॉप: रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्दा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड या स्थानकांवर थांबेल.
 
या सर्व गाडयांच्या डब्यांची स्थिती - एक एसी 2 टिअर कम एसी 3 टिअर, चार एसी 3 टिअर, 11 स्लीपर क्लास, 6 सेकंड क्लास सीटिंग असेल तसेच सविस्तर वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा. 
 
वरील सर्व प्रवासी गाड्यांसाठी 8 जुलै 2021 पासून बुकिंग करु शकतात.  पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम (पीआरएस) काऊंटर आणि  IRCTC च्या वेबसाईटवर ही बुकिंग होणार आहे.