शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (12:33 IST)

Gold Price Today:सोन्या-चांदीच्या दरात मोठी झेप, सोन्याने विक्रमी उच्चांक गाठला

old Price Today 4th July 2022:सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी उसळी आली आहे. जेव्हा सरकारने  सोन्यावरील आयात शुल्कात 5 टक्के वाढ केली आहे, तेव्हापासून सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे. अवघ्या दोन व्यापार सत्रात सोने सुमारे 1700 रुपयांनी महागले आणि पुन्हा एकदा 52 हजारांच्या पुढे गेले. एवढेच नाही तर सोन्याचे फ्युचर्स किमती आज दोन महिन्यांतील सर्वाधिक आहेत.
 
 सोन्या-चांदीचा भाव किती?
आज सकाळी, मल्टीकमोडिटी एक्सचेंजवर 24 कॅरेट शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 323 रुपयांनी वाढून 52,240 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे, तर MCX वर चांदीचा भाव 58 रुपयांनी वाढून 57,800 रुपये प्रति किलो झाला आहे. त्याच वेळी, आज व्यवहाराच्या सुरुवातीला सोन्याचा भाव 52,050 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर होता. मात्र पुरवठ्यावर परिणाम झाल्याने लवकरच त्यात तेजी आली.