रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 मे 2022 (18:34 IST)

Gold Price Today :एका आठवड्यात सोने 1,500 रुपयांनी स्वस्त, आजचे दर तपासा

gold
जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किमती घसरल्याचा फायदा भारतीय ग्राहकांनाही मिळत आहे. लग्नसराईचा हंगाम असूनही सोन्याचा भाव अद्याप तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर असून अवघ्या आठवडाभरात सोने 1500 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे.
 
मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर शुक्रवारी सकाळी 24-कॅरेट शुद्धतेचे सोने वायदे 0.03 टक्क्यांनी घसरून 50,158 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. या आठवड्यात सोन्याचा भाव सुमारे 1,500 रुपयांनी घसरला आहे. आज सकाळी सोन्याचा व्यवहार 50,067  रुपयांच्या पातळीवरून सुरू झाला आणि काही वेळातच त्यात थोडी उसळी आली. सोन्याचा भाव सध्या तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहे. मागील सत्रातच सोन्याचा भाव1.2 टक्क्यांनी खाली आला होता. मार्चच्या सुरुवातीला सोन्याचा भाव 56 हजारांच्या जवळ पोहोचला होता.
 
सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. आज सकाळी MCX वर, चांदीची फ्युचर्स किंमत 0.3 टक्क्यांनी वाढून 58,920 रुपये प्रति किलोवर झाली आहे. त्यामुळे मागील सत्रात चांदीची किंमत 3.3 टक्क्यांनी म्हणजेच सुमारे 2,000 रुपयांनी खाली आली होती. आज चांदीचा व्यवहार 58,954 रुपये प्रति किलोने सुरू झाला, परंतु काही काळानंतर त्यात घसरण झाली.
 
डॉलरच्या मजबूतीमुळे सध्या सोन्याच्या खरेदीचा दबाव दिसून येत आहे, त्यामुळे त्याचे भावही नरमले आहेत. सोन्याची स्पॉट किंमत सध्या 0.1 टक्क्यांनी घसरून $1,820.54 प्रति औंस आहे, तर चांदीची स्पॉट किंमत 0.5 टक्क्यांनी घसरून $20.76 प्रति औंस झाली आहे.