गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 (18:15 IST)

Gold Silver Price धनत्रयोदशीला सोन्या-चांदीचे दर घसरले

Gold Silver Price On Dhanteras 2022: आज 22 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. तुम्हीही सोने-चांदी खरेदी करणार असाल (gold silver latest price), तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर सातत्याने कमी होत आहेत. अशा स्थितीत सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहक उत्सुक आहेत. यंदा धनत्रयोदशी दिवाळीला बंपर खरेदी होऊ शकते, असा विश्वासही व्यापाऱ्यांचा आहे. सराफा बाजारात सोने यंदाच्या विक्रमी उच्चांकावरून सुमारे 3500 रुपयांनी स्वस्त होत आहे. त्याचबरोबर चांदी 15,000 रुपयांपर्यंत स्वस्त होत आहे. 
 
 3541 रुपयांनी स्वस्त सोने
 जागतिक बाजारात धातूंच्या किमतीत घसरण होत असताना सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, सध्या 24 कॅरेट सोन्याची किंमत 50062 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. या वर्षी 18 एप्रिल रोजी सोन्याने 53,603 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. म्हणजेच सध्याच्या विक्रमी उच्चांकावरून सोने 3541 रुपयांनी स्वस्त होत आहे.
Edited by : Smita Joshi