गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 31 जुलै 2017 (16:47 IST)

अखेर इन्कम टॅक्स रिर्टन फाईल करण्यासाठी मुदतवाढ

आयकर विवरण पत्र अर्थात इन्कम टॅक्स रिर्टन फाईल करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आयटी रिटर्न फाईल करण्याची 31 जुलै ही शेवटची मुदत असते. पण करदात्यांचा वाढता ओघ लक्षात घेता, प्रशासनाने ही मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आता 5 ऑगस्टपर्यंत तुम्हाला आयटी रिटर्न भरता येणार आहे.

करदात्यांना आयटी रिटर्न भरण्यासाठी येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन, मुदतवाढ देण्यात येत आहे, असं प्रशासनाने म्हटलं आहे. 2016-17 या आर्थिक वर्षाचं आयटी रिटर्न भरण्यासाठी आता 5 ऑगस्ट 2017 ही मुदत असेल.