1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 20 ऑगस्ट 2018 (16:03 IST)

भारतीय बँकांना तब्बल 28 हजार 500 कोटींचा तोटा

जानेवारी ते डिसेंबर 2017 या काळात भारतीय बँकांना तब्बल 28 हजार 500 कोटींचा तोटा झाला आहे. या बँकामध्ये बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय सारख्या बँकांचाही समावेश असून, माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती समोर आली आहे. अभय कोलरकर या आरटीआय कार्यकर्त्याने ही माहिती मागवली होती. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार यात जिल्हा बँकाचा समावेश केलेला नाही. 
 
रिझर्व्ह बँकेने ७९ बँकांची माहिती दिली असून २५ बँका तोट्यात असल्याचे नमूद केले आहे. पण ५४ बँकांनी या वर्षात ४७ हजार १७० कोटी रुपयांचा नफा कमवाल्याची माहिती रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली आहे.