बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 8 एप्रिल 2020 (10:17 IST)

30 एप्रिल पर्यंत खासगी रेल्वेचे बुकिंग रद्द

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयआरसीटीसीने आपल्या 3 खासगी रेल्वेचे बुकिंग 30 एप्रिल पर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यात दोन तेजस ट्रेन आणि एक काशी महाकाल एक्स्प्रेसचा समावेश आहे. या तिन्ही रेल्वेंचे बुकिंग केलेल्या सर्व प्रवाशांना त्यांचे संपूर्ण पैसे रिफंडद्वारे मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
 
लॉकडाउनमुळे यात 25 मार्च ते 15 एप्रिलपर्यंतचे सर्व बुकिंग बंद करण्यात आले होते. मात्र आता 30 एप्रिल पर्यंत सर्व बुकिंग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
तसेच संपूर्ण देशात 21 दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर रेल्वेसेवा 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या दरम्यान रद्द झालेल्या रेल्वेसांठी प्रवाशांनी काढलेले तिकीट रद्द करु नये असे IRCTC कडून सांगण्यात आलं होतं.