सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (11:04 IST)

IRCTC ची वेबसाइट अपग्रेड, रेल्वे तिकीट बुकिंग करणे सोपे, रिफंडची रक्कम तातडीने खात्यात होणार जमा

इंडियन रेल्वे टुरिझम अॅण्ड केटरिंग कार्पोरेशनने नुकतीच आपली वेबसाईट अपग्रेड केली. तसेच IRCTC-iPay हा पेमेंट गेट-वे देखील सुरु केल्याने आता प्रवाशांना रेल्वे तिकीट बुकिंग करणे सोपे होणार आहे. आता ति‍कीट बु‍क करताना अधिक वेळ वाट पाहावी लागणार नाही. यामुळे वेळेची निश्चितच बचत होणार आहे. तसेच तिकीट बुकिंग रद्द केल्यावर रिफंडची रक्कम लगेच खात्यात जमा होणार आहे.
 
IRCTC-iPay च्या माहितीनुसार, आता IRCTC वेबसाईट किंवा अॅपचा वापर करणाऱ्या प्रवाशांना तत्काळ रिफंड मिळेल. या सुविधेसाठी प्रवाशांना यूजर्सला आपल्या युपीआय बॅंक खाते किंवा अन्य इतर पर्यायद्वारे एकदाच डेबिट करण्यासाठी परवानगी द्यावी लागेल. त्यानंतर ते पेमेंट इन्स्ट्रुमेंट पुढील ट्रान्झॅक्शनसाठी ग्राह्य ठरेल. अशात जेव्हा कधीही प्रवासी बुकिंग रद्द करेल त्याला लगेल रिफंड मिळेल म्हणजे पैसे तातडीन खात्यात जमा केले जातील. यापूर्वी रिफंड मिळण्यासाठी काही दिवस लागायचे. 
 
या सुविधेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच कर्न्फम तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल.