रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 एप्रिल 2018 (13:48 IST)

देशात सात वर्षातील उच्चांकी रोजगार निर्मिती

देशात मार्च महिन्यात विविध क्षेत्रांमध्ये नोकऱ्या निर्मितीचे प्रमाण वाढले आहे. सोबतच रोजगार निर्मिती सात वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. विविध कंपन्या कर्मचारी संख्या वेगाने वाढवत असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.
 
निक्की इंडिया सर्व्हीसेस बिझनेस अॅक्टीव्हीटीचा निर्देशांक मार्च महिन्यात ५०.३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. फेब्रुवारी महिन्यात हाच निर्देशांक ४७.८ टक्क्यांवर होता. निर्देशांक ५० च्या पुढे असणे हा अर्थव्यवस्था विस्तारत असल्याचे लक्षण आहे. फेब्रुवारीमध्ये निर्देशांकात झालेली घट ही क्षणिक ठरली आहे. हा सर्वेक्षण अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी दिलासा देणारा  आहे.