फोर्ब्सच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी अव्वल
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी फोर्ब्सने 2021 नुकतीच जाहीर केली आहे. यात 10 सर्वात श्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी पहिल्या स्थानी पोहोचले आहे. तर गौतम अदानी दुसर्या स्थानी आहेत. यात मुकेश अंबानी यांची संपत्ती 84.5 अब्ज डॉलर्स इतकी नोंदवण्यात आली आहे. तर या पाठोपाठ अदानी यांची संपत्ती 50.5 अब्ज डॉलर्स इतकी आहे.
अरबपतींच्या संपत्तीत वाढ होत असल्याने शेअर बाजारातही तेजीचे वातावरण आहे. देशात कोरोना संसर्ग वाढत असला तरी याचा फायदा उद्योगपतींना होत आहे. अंबानींनी जिओ टेलिकॉम कंपनीत 35 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली. 2021 पर्यंत या कंपनीने कर्जाचे उद्दिष्ट शून्यावर आणण्याचे ठरवले आणि ते पूर्णही केले. आशियाच्या सर्वात श्रीमंतांमधील एक असलेल्या रिलायन्स समूहाने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातील नवनवीन बदल, योजना आणण्यात मागील वर्षात मोठी गुंतवणूक केली.