बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020 (11:26 IST)

नवी कर रचना; आयकर विभागाचे 'ई-कॅल्क्युलेटर'

चालू आर्थिक वर्षाकरिता (2019-20) नवीन कर रचना स्वीकारणार्‍या करदातंसाठी आयकर विभागाने  'ई- कॅल्क्युलेटर' उपलब्ध केले आहे. 'ई-कॅल्क्युलेटर' करदातंना आपल्याला नेमका किती वार्षिक कर भरावा लागेल, याची अचूक माहिती देणार आहे. 
 
करदात्यांनी कर मूल्यापनासाठी वैयक्तिक माहिती, उत्पन्न याचा तपशील व्यवस्थित भरल्यानंतर 'ई-कॅल्क्युलेटर' करदेय रक्कम सादर करेल. आयकर विभागाच्या ttps://www.incometaxindiaefiling. gov.in या वेबसाइटवर 'ई- कॅल्क्युलेटर' उपलब्ध आहे. या सेवेशिवाय वेबसाइटवर आयकर रिटर्न सुविधा देखील उपलब्ध आहे. यंदा सरकारने कर रचनेत बदल करून ती अधिक आकर्षक केली आहे. नव्या कर रचनेत 2.5 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न करमुक्त आहे.