बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 जुलै 2020 (11:10 IST)

मुकेश अंबानीची आरआयएल (RIL) ने आणखी एक विक्रम निर्माण केला, जगातील 48 व्या क्रमांकाची बहुमूल्य कंपनी बनली

बाजार भांडवलाच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Limited) आता जगातील 50 सर्वाधिक मूल्यवान कंपन्यांच्या (50 Most Valued Companies) यादीत दाखल झाली आहे. तसेच रिलायन्स समूह (RIL Market Cap) ही आता 13 लाख कोटी रुपये बाजार भांडवल असलेली भारतातील पहिली कंपनी बनली आहे. तेलापासून ते टेलिकॉम क्षेत्रापर्यंत, आरआयएल जगातील सर्वाधिक मूल्यवान 50 कंपन्यांच्या यादीत 48 व्या स्थानावर आहे.
 
या यादीमध्ये सौदी अरामको (Saudi Aramco) सर्वात उच्च स्थानावर आहे. या कंपनीचा एकूण मार्केट कॅप 1.7 लाख कोटी डॉलर इतका आहे. यानंतर अॅपल, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन इंक आणि अल्फाबेट या दिग्गज कंपन्या आहेत. 
 
रेकॉर्ड स्तरावर आहेत रिलायन्स समूहाचे शेअर्सगुरुवारी दिवसभराच्या कारभारानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) आरआयएलचा शेअर 3.59 टक्क्यांनी वाढून 2,076 रुपये प्रति शेअर झाला आहे. यानंतर कंपनीचा एकूण मार्केट कॅप 13 लाख कोटींच्या पलीकडे गेला आहे.
 
हा स्तर पार करणारा रिलायन्स समूह ही भारतातील पहिली कंपनी आहे. नुकतच राइट्स इश्यू अंतर्गत (RIL Rights Issue) जारी करण्यात आलेल्या शेअर्सना देखील यामध्ये जोडले तर रिलायन्स समूहाची मार्केट कॅप 13.5 लाख कोटी होते. आतापर्यंत अशी कोणतीही भारतीय कंपनी आली नाही जिची बाजारपेठ या पातळीवर गेली असेल.
 
या दिग्गज कंपन्या रिलायन्सपेक्षा मागेशेव्हरॉन कॉर्पोरेशन, ओरेकल, यूनिलिव्हर, बँक ऑफ चायना, बीएचपी ग्रृप, रॉयल डच शेल आणि सॉफ्टबँक यांसारख्या दिग्गज कंपन्यांपेक्षा रिलायन्स समूहाची मार्केट कॅप जास्त आहे. टॉप 100च्या यादीत TCS देखील समाविष्ट आहे.