बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 मार्च 2022 (09:08 IST)

रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे राज्यात खतांचा तुटवडा निर्माण होईल!

रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे मत कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले आहे.
 
कृषिमंत्री दादा भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. सध्याच्या घडीला रशिया युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांच्या प्रक्रियेसाठी लागणारे रॉ मटेरियल, केमिकल्स चा आयात बंद झाली आहे. परिणामी खतांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येते.
 
खरीप हंगामामध्ये रासायनिक खतांचा तुटवडा होऊ नये, म्हणून आत्ताच्या घडीला हा ऑफ सिझन आहे, रासायनिक खतांच्या संदर्भातील प्रक्रिया अशी आहे की केंद्र सरकारकडून प्रत्येक राज्याला तर सालाबादाप्रमाणे आवंटन दिले जाते. या राज्याला या महिन्यामध्ये किती खतांचा पुरवठा त्या ठिकाणी करायचा? याचा एक आराखडा देशाचा केला जातो आणि त्याप्रमाणे त्या त्या राज्याला त्या त्या महिन्यामध्ये खतांचे वितरण केले जाते.
 
गेल्या काही दोन तीन महिन्या पासून त्याच्यात काही प्रमाणात होत असेल तर मिळाले त्याच्यामध्ये आपण नियोजन करून भागविण्याचा प्रयत्न केला. त्या कंपनीतुन खत वितरित झाल्याच्या नंतर राज्याला आल्याच्या नंतर , त्या जिल्ह्याला मिळाला, त्या डीलरला, त्या दुकानात गेल्यानंतर, ते शेतकऱ्यांना विक्री झाल्यानंतर याचे पूर्ण ट्रॅकिंग सिस्टम आहे कोणत्या शेतकऱ्याला करावे लागते.
 
त्यानुसार किती खताचा साठा उपलब्ध आहे, याची माहिती मिळते. साधारणतः काही स्थानिक पातळीवर रिटेल ची दुकाने असतात, येथून शेतकऱ्यांना खत पुरवठा केला जातो. यावेळी दुकानदार खताची पावती वैगरे करतो, मात्र खतावणी करत नाही, ती खतावणी केली नाही तर शिल्लक दिसते, मग केंद्र सरकारने असे वाटते की, राज्यात अद्याल खत उपलब्ध आहे, आणि म्हणून द्यायची काही आवश्यकता नाही.
 
त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या, जी खत विक्री कराल, त्याची खतावणी करा, अशा सूचना दुकानदार, डीलर, कंपन्यांना केली असल्याचे भुसे यांनी सांगितले.