शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 डिसेंबर 2017 (08:43 IST)

नवीन वर्षात स्टेट बँकेत विलीन झालेल्या बँकांचे धनादेश स्वीकारणार नाही

येत्या एक जानेवारीपासून स्टेट बँकेत विलीन झालेल्या बँकांचे धनादेश न स्वीकारण्याचा निर्णय भारतीय स्टेट बँकेने घेतला आहे.  स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ रायपूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद  आणि भारतीय महिला बँक या बँका स्टेट बँक ऑफ इंडियात विलीन झाल्या होत्या.

या बँकांचे धनादेश 31 डिसेंबरपर्यंतच  चालणार आहेत. खातेदारांनी नव्या चेकबुकसाठी अर्ज  करावेत, असे बँकेने म्हटले आहे. स्टेट बँकेच्या जवळच्या शाखेत किंवा एटीएममध्ये जाऊन खातेदार नव्या चेकबुकसाठी अर्ज भरू शकतात किंवा स्टेट बँकेच्या अ‍ॅपवरूनही त्यांना नवीन  चेकबुक मिळवता येईल. एसबीआयने  मोठ्या शहरांमधील काही शाखांची नावे, ब्रँच कोड आणि आयएफएससी कोडही बदललेत. त्यामुळे खातेदारांनी  नव्या वर्षात आपल्या खात्याची संपूर्ण माहिती तपासून घेण्याचे आवाहन बँकेने केले आहे.