मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 7 मे 2022 (15:40 IST)

राज्यातील नेत्यांनी थकवलंय लाखोंचं वीजबिल, उर्जा विभागाकडून यादी जाहीर

bijali
पुणे :सर्वसामान्य नागरिकांचे वीजबिल थकले तर त्यांच्यावर कारवाई केली जाते. वीज कनेक्शन कट करण्यात येते. लोकप्रतिनिधींवर मात्र अशी कारवाई झाल्याचे पहायला मिळत नाही. उर्जा विभागाने नुकतीच राज्यातील थकीत वीजबिलांची यादी जाहीर केली आहे. त्यामधून अशीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील मंत्री, आमदार, खासदार यांनी लाखोंचं वीजबिल थकवलं आहे. त्यामध्ये माणचे आमदार जयकुमार गोरे (jaykumar gore) अव्वल स्थानी आहेत.
 
30 एप्रिल 2022 पर्यंत राज्यातील आमदार-खासदार आणि मंत्री असे एकूण 372 वीज ग्राहकांनी 1 कोटी 27 लाखांचे वीजबिल थकवलं आहे. ऊर्जा विभागाने जाहीर केलेल्या यादीमध्ये राज्यातील कोणकोणत्या नेत्यांची नावं आणि त्याच्या नावावर किती वीजबिल थकीत आहे, ते खालीलप्रमाणे :
 
माणचे भाजप आमदार जयकुमार गोरे – 7 लाख आमदार बबनराव शिंदे व त्यांचे आमदार बंधू संजय शिंदे आणि कुटुंबियांची तब्बल 22 वीज जोडणीतील तब्बल 7. 86 लाख थकीत
आरोग्यमंत्री राजेश टोपे – 4 लाख
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत – 3.53 लाख
खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या चार वीज जोडणीतील – 3 लाख
खासदार रजनी पाटील – 3 लाख
आमदार वैभव नाईक यांच्या औद्योगिक वीज जोडणीची – 2.80 लाख
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले – 2.63 लाख
आमदार अशिष जयस्वाल – 3.36 लाख
आमदार संदीप क्षीरसागर – 2.30 लाख
माजी गृहमंत्री अनिल देशमुख – 2.25 लाख
मंत्री संदीपान भुमरे – 1.50 लाख
माजी खासदार प्रतापराव जाधव -1.50 लाख
सुमन सदाशिव खोत – 1.32 लाख
माजी मंत्री सुरेश खाडे आणि कुटुंबिय – 1.32 लाख
युवराज संभाजीराजे – 1.25 लाख
आमदार संग्राम थोपटे – 1 लाख
आमदार प्रकाश सोळंके – 80 हजार
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे – 70 हजार
आमदार महेश शिंदे – 70 हजार
माजी आमदार शिरीष चौधरी – 70 हजार
माजी मंत्री सुभाष देशमुख – 60 हजार
राज्यमंत्री संजय बनसोडे – 50 हजार
शिवसेना आमदार सुहास कांदे – 50 हजार
माजी मंत्री विजयकुमार गावित – 42 हजार
आमदार रवी राणा – 40 हजार
राज्यमंत्री विश्वजित कदम – 20 हजार
आमदार समाधान आवताडे – 20 हजार
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात – 10 हजार