बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 14 जुलै 2021 (11:19 IST)

सीएनजी आणि पाइपलाइन गॅसच्या किंमतीही वाढल्या,आता जास्त पैसे द्यावे लागणार

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ झाल्यानंतर आता सीएनजीच्या किंमतीही आता वाढल्या आहेत. आजपासून देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सीएनजीसाठी जास्त रुपये खर्च करावे लागणार आहेत.महानगर गॅस लिमिटेडने मंगळवारी याबाबत माहिती दिली होती.सीएनजीच्या किंमतीत प्रति किलो 2 पैसे 58 पैशांनी वाढ झाली असून आता त्याची नवीन किंमत 51.98 रुपये प्रति किलो झाली आहे.
 
घरगुती पाइपलाइन गॅसच्या दरातही प्रति युनिट 55 पैशांची वाढ झाली आहे. जर आपण PNGच्या किंमतींबद्दल चर्चा केली तर त्यात प्रति SCM मध्येही 55 पैशांची वाढ करण्यात आली आहे. घरगुती पाइपलाइन गॅसची किंमत प्रति युनिट 30.40रुपये स्लॅब 1 आणि 36 ​​रुपये प्रति युनिट स्लॅब 2 साठी असणार. सर्व वाढलेल्या दरात कर समाविष्ट आहेत.
 
 
तथापि, कंपनीने असा दावा केला आहे की या वाढानंतरही सीएनजीचे दर देशातील पेट्रोल आणि डिझेलपेक्षा स्वस्त राहतील.आज मुंबईत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 107.20 रुपये तर डिझेलची किंमत 97.29 रुपये प्रतिलिटर आहे.
 
 नुकतीच दिल्लीतही सीएनजीच्या किंमती वाढविण्यात आल्या. दिल्लीत सीएनजीच्या किंमतीत प्रति किलो 90 पैसे वाढ झाली.या वाढीनंतर दिल्लीत सीएनजीची किंमत 43.40 रुपये प्रति किलोवरून वाढून. 44.30 रुपये प्रतिकिलो झाली आहे.