काय सांगता ,70 हजार कमविण्याची संधी
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशावर आर्थिक संकटाचे सावट आहेच कित्येक लोकांनी या साथीच्या रोगामुळे आपली नोकरी गमावली आहे.त्यासाठी सध्या केंद्रसरकारचे लक्ष उद्योजक निर्माण करण्यावर आहे.त्यामुळे ते तरुणांना काही उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.काही व्यवसाय करायचे असल्यास सरकार कडून कर्ज देखील दिले जात आहे.त्या कर्जाची फेडणी आपण व्यवसाय चांगल्या रीतीने सुरु झाल्यावर करू शकता.
या योजनेचा फायदा बऱ्याच लोकांना झाला आहे.आपण कोणतेही उद्योग सुरु करू शकता. या साठी आपण पंत प्रधान मुद्रा कर्ज योजने अंतर्गत कर्ज घेऊ शकता. उदाहरणार्थ आपण डेयरी व्यवसाय करून देखील चांगले उत्पन्न कमावू शकता. या साठी सुरुवातीस 16.5 लाख रुपये खर्च येतो.मुद्रा योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवलाच्या 70 टक्के रक्कम उपलब्ध होईल. बँकेकडून 7.5 लाख रुपयांचं टर्म लोन आणि वर्किंग केपीटल म्हणून 4 लाख रुपये योजनेतून मिळतात.एकूण लागणाऱ्या खर्च पैकी आपल्याला 5 लाखाची व्यवस्था करावी लागणार.
आपण दही,दूध,लोणी,तूप,पनीर,असे डेअरी पदार्थ बनवून विकू शकता.व्यवसायाला वाढविण्यासाठी आपण पंत प्रधान मुद्रा कर्ज योजने अंतर्गत सरकार करून आर्थिक मदत घेऊ शकता.व्यवसाय चांगला सुरु झाल्यावर आपण या कर्जाची रक्कम हफ्त्या-हफ्त्याने फेडू शकता.आपण पंत प्रधान मुद्रा योजने अंतर्गत कोणते ही उद्योग सुरु करून आर्थिक उत्पन्न मिळवू शकता.आणि या योजने चा लाभ घेऊ शकता.