रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (14:42 IST)

BBM3 :मीरा आणि स्नेहामध्ये होणार जोरदार भांडण

सध्या मराठी कलर्सवर बिगबॉस मराठी 3 हा रियालिटी शो प्रचंड गाजला आहे. या शो मध्ये स्पर्धकांना काही टास्क करण्यास सांगितले जाते. मागील भागात तृप्ती देसाई या शो मधून बाहेर पडल्या. या बिगबॉसच्या घरात कॅप्टन मीराने काल बिगबॉसला अशा काही स्पर्धकांची नावे दिली .ज्यांच्या मुळे दिलेले टास्क रद्द होतात. आणि त्यात काही नावे अशी होती ज्या स्पर्धकांनी नियम भंग केले आहे. त्यात सोनाली, विकास, जय, विशाल आणि दादूस  हे आहेत. बिगबॉसच्या आदेशानुसार अशी काही नावे कॅप्टन मीराला आज देखील द्यायची आहे. या मुळे मीरा आणि स्नेहांमध्ये जोरदार भांडण झाले. मीरा चे म्हणणे आहे की,मी समोर असताना माझ्या समोर काय ते बोलायचे. या मुळे स्नेहा आणि मीरामध्ये चांगलेच वाद झाले .नेमकी वादाला कारण तरी काय आहे. हे या रियालिटी शो च्या पुढील भागातच कळू शकेल.