शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 21 जानेवारी 2023 (14:11 IST)

प्रसिद्ध निर्माते- दिग्दर्शक महेश कोठारेंच्या वडिलांचे निधन

प्रसिद्ध निर्माते- दिग्दर्शक महेश कोठारें यांचे वडिल ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्यचित्रपट निर्मिते, अभिनेते, अंबर कोठारे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 96 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी जेनमा,मुलगा महेश कोठारे, सून, नातू, आदिनाथ कोठारे,  नातसून आणि पणती असा परिवार आहे. अंबर कोठारे यांनी प्रायोगिक रंगभूमीवर बऱ्याच काळ काम केले. ते आयएनटी 'इंडियन नॅशनल थियेटर संस्थेचे मराठी विभागाचे पहिले सचिव होते. त्यांनी संस्थेकडून अनेक नाटके सादर केली. 'झुंजारराव नाटकातील त्यांची भूमिका आणि अभिनय प्रेक्षकांना आवडली.त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यावर बँकेत नोकरी केली. ते ब्रिटिश बँक ऑफ दि मिडिल ईस्ट या बँकेत विविध पदांवर होते. त्यांनी नोकरी सांभाळत रंगभूमीची आवड जोपासली आणि रंगभूमीत अनेक वर्षे काम केली. महेश कोठारे यांच्या दिग्दर्शनाच्या क्षेत्रात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
 
Edited By- Priya Dixit