‘भाई…व्यक्ती की वल्ली’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
तमाम मराठी वाचकांचे आवडते लेखक म्हणजे पु. ल. देशपांडे. त्यांच्या आयुष्यावर लवकरच एक चित्रपट ४ जानेवारी २०१९ ला रिलीज होणार असून पु. ल. देशपांडे यांच्या ९९व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे.
महेश मांजरेकर यांच्या ‘फाळकेज फॅक्टरी’ या निर्मिती संस्थेअंतर्गत ‘भाई…व्यक्ती की वल्ली’ चित्रपटाची निर्मिती होत आहे. या चित्रपटातून भाई आणि सुनीताबाई यांच नातं, पु.लंची मित्रमंडळी अशी अनेक पात्र आपल्यासमोर येणार आहेत. या चित्रपटातून जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, बाबा आमटे, भीमसेन जोशी, दुर्गा भागवत, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व अशा अनेक व्यक्तीरेखाही प्रेक्षकांना दिसणार आहेत.
‘हंटर’, ‘वायझेड’ या चित्रपटांत मुख्य भूमिकेत झळकलेला अभिनेता सागर देशमुख पु.ल. देशपांडे यांची भूमिका साकारणार आहे. तर ‘आपलं माणूस’, ‘टेक केअर गुड नाईट’, ‘अस्तू’ अशा चित्रपटांमध्ये दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलेली अभिनेत्री इरावती हर्षे सुनीताबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे.