मिसेस स्वप्नील जोशीच्या क्लिनिकचे सई ताम्हणकरने केले उद्घाटन
मराठीचा सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशीची पत्नी डॉ. लीना जोशी ह्या खाजगी दंतचिकित्सक असून, नुकत्याच बोरीवली येथील त्यांच्या क्लिनिकचे मराठीची गलेम अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. स्वप्नील - लीना दाम्पत्याला दोन मुले असून, गेल्याच वर्षी या दोघांनी त्यांना पुत्ररत्न झाल्याची गोड बातमी दिली होती. त्यामुळे काही महिने विश्रांती घेतल्यानंतर, लीना पुन्हा एकदा जोमाने आपल्या क्लिनिकमध्ये व्यस्त होणार आहे. त्यामुळे तिच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी स्वप्नील-लीनाची जवळची मैत्रीण सई ताम्हणकरने, खास आपल्या विशेष शैलीत क्लिनिकच्या सेकंड चेअरचे उदघाटन केले.