सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019 (14:19 IST)

नेहा शितोळे सोशल मीडियावर झाली ट्रेंड !

बिगबॉस मराठी सीजन २ ची धाकड स्पर्धक नेहा शितोळेची सोशल मीडियावर वाहवा होत आहे. बिगबॉसच्या घरातील तिचा वावर आणि तिच्या स्ट्रॅटेजीस पाहता, घराबाहेर तिचे लाखो चाहते झाले आहेत. इतकेच नव्हे तर, घरातल्या सदस्यांना देखील ती आवडू लागली असल्याकारणामुळे सोशल मीडियावर #NehaWinningHearts हा हॅशटेग मोठ्या प्रमाणात ट्रेंड झाला आहे. ट्विटरवर या हॅशटेगची मोठी हवा झाली असून, यावरून सोशल मीडियावर आतापर्यंत १५.७ हजार पोस्ट आहेत. नेहाच्या वाढत्या प्रसिद्धीचा हा पुरावा असून, याद्वारे तिने बिगबॉस मराठी सीजन २ च्या ट्रॉफीवर आपली प्रबळ दावेदारी सिद्ध केली आहे.