लग्नघरी रंगणार शामक स्टाईल "बँड बाजा डान्स"
लग्न असो वा कोणताही शुभप्रसंग, गाण्यांच्या तालावर ताल धरणे हल्ली ट्रेंडी आहेच. त्यात लग्न असेल तर उत्साह नाचगाण्याचा उत्साह वेगळाच. यंदाच्या वर्षांमध्ये लग्नाचे मुहूर्त कमी असल्यामुळे सगळेजण "लगीनघाईत" गुंतले आहेत. आधीच्या काळात लग्नसमारंभ हा किमान तीन ते चार दिवसांचा तरी असायचा यात वेगवेगळे कार्यक्रम असायचे जसे की संगीत, मेहंदी, देवदर्शन, इत्यादी.... वेळेचा अभाव आणि त्यात शॉर्टकट मारून झटपट सगळं आटपायच्या गोंधळात शहरात राहणाऱ्या लोकांसमोर कोर्टमॅरेज हा सोपा पर्याय उपलब्ध असतो. पण ज्या लोकांना लग्न एन्जॉय करायचे असते ते पारंपरिक पद्धतीने लग्न करण्यात रुची ठेवतात. आणि त्यामुळेच लग्नसमारंभ हा फक्त एका दिवसापर्यंत मर्यादित न राहता आता शहरातही लग्नसमारंभाचं स्वरूप बदललेलं पाहायला मिळतं. त्यात इव्हेंड मॅनेजमेंट कंपन्यांमुळे तर लग्न हा एक मोठा इव्हेंटच झाला आहे.
आपल्या सोशल मीडिया वर प्रत्येकजण आपल्या मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांचे लग्नाचे "अपडेट्स" टाकत असतात. आपल्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या लग्नात आपण एकदम "कुल" डान्स करावा असं प्रत्येकाला वाटतं आणि त्यामुळे स्पेशल डान्स क्लास किंवा डान्स सेशन अटेंड करताना ही तरुणाई दिसते. सध्या बॉलिवूड डान्स स्टाईल सर्वांच्या आवडीची डान्स आहे आणि तरुणाई बॉलिवूड गाण्यांवर थिरकताना दिसते. अशावेळी जर प्रत्यक्षात सेलिब्रिटी कोरिओग्राफर आपल्याला डान्स शिकवणार असतील तर......! धम्माल... मग तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या लग्नात तुम्हीच सुपरस्टार...
हे शक्य होणार आहे डान्सचे गुरु शामक दावर यांच्या "बँड बाजा डान्स" या स्पेशल डान्स सेशनमुळे. समरफंक अंतर्गत बँड बाजा डान्स हे सेशन सर्वांसाठी येत आहे. बँड बाजा डान्सची खासियत अशी आहे कि हे सेशन लग्नात नाचणाऱ्या लहान मुलांपासून म्हाताऱ्या लोकांसाठी आहे. आपल्या प्रियजनांच्या लग्नात डान्समार्फत सरप्राईज देण्यासाठी स्वतःला तयार करण्यासाठी हे सेशन एकदम झक्कास असेल. सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक शामक दावर आणि त्यांची टीम त्यांच्या या खास सेशनद्वारे येत्या १४ एप्रिलपासून पासून हे सेशन घेणार आहे. तसेच 14 मार्चपासून यासाठीची नोंदणी सुरू होणार आहे. तर तुम्हीही तयार आहात ना "बँड बाजा डान्स" स्टाईलसोबत लग्नांमध्ये धमाल करण्यासाठी...