मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (09:16 IST)

अक्षय कर्णेवारचा अनोखा विक्रम

विदर्भचा क्रिकेटपटू अक्षय कर्णेवारने ट्वेन्टी20 सामन्यात चारही षटकं निर्धाव टाकण्याचा विक्रम केला आहे. असं करणारा तो जगातला पहिला खेळाडू ठरला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी20 स्पर्धेत अक्षयने मणिपूरविरुद्धच्या सामन्यात हा विक्रम केला. एकही धाव न देता अक्षयने 2 विकेट्सही पटकावल्या.
याआधी तीन षटकं निर्धाव टाकण्याचा विक्रम गौरव गंभीरच्या नावावर होता. अक्षयने हा विक्रम मोडला आहे. विदर्भने 222 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना मणिपूरचा डाव 55 धावात आटोपला.