बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 18 एप्रिल 2019 (16:42 IST)

अंबाती रायुडूचा बाउन्सर, 3डी चष्म्याच्या विनोद पडू शकतो महाग

ऑस्ट्रेलिया मालिका सोडली तर अंबाती रायडूने सतत चवथ्या आणि पाचव्या क्रमांकावर भारतासाठी धावा काढल्या आहे. इतकेच नव्हे तर रायुडूचे 50 हून अधिक एकदिवसीय सामने खेळल्यानंतर सरासरी 47 पेक्षा जास्तचा आहे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे की न्यूझीलंड दौर्‍यावर त्याने सर्वाधिक धावा काढल्या होत्या.
 
5 सामन्यात रायुडूने 190 धावा काढल्या. इतके चांगले प्रदर्शन केल्यानंतरही वर्ल्ड कपसाठी जाणार्‍या संघात विजय शंकरने त्याची जागा घेतली. बर्‍याच  माजी क्रिकेटपटूंनी त्याची टीका देखील केली आहे. म्हणूनच त्याच्या ट्विटमध्ये तणाव आणि वेदना दोन्ही दिसल्या. वर्ल्ड कपच्या भारतीय संघात जागा मिळाली नसल्यामुळे अंबाती रायुडूने आपल्या ट्विटरवर लिहिले की 2019 वर्ल्ड कप पाहण्यासाठी त्याने 3 डी चष्म्यांचा ऑर्डर दिला आहे.
 
काही महिन्यांपूर्वी कर्णधार विराट कोहलीद्वारे रायुडूला चवथ्या क्रमांकावर भारताचे पहिली पसंती म्हणून ओळखले जात होते, पण गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध घरगुती मालिकेत कमी स्कोरने निवडक समितीला पुनर्विचाराला पाडलं. त्याचा इशारा निवडाकांवर होता, ज्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. निवड समितीचे एमएसके प्रसाद यांनी सांगितले होते की शंकर फलंदाजीसह गोलंदाजीही करू शकतो. इंग्लंडमध्ये गोलंदाज्यांना जास्त वाव मिळतो, त्यात तो शंकर यशस्वी ठरेल, यासह तो एक चांगला क्षेत्ररक्षक पण आहे. शंकरची प्रशंसा करताना प्रसादने 3 डी शब्दाचा वापर केला होता, ज्यावर अंबातीने थट्टा केली.
 
भावनात्मकपणे रायुडूने हे ट्विट करून तर दिले आहे पण असे नको की हा ट्विट त्याच्या करिअरसाठी महाग पडून जाईल. तथापि त्याच्या या ट्विटवर जोरदार टिका सुरू आहे.