रविवार, 10 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 12 ऑगस्ट 2024 (12:51 IST)

अफगाणिस्तानच्या या फलंदाजावर पाच वर्षांची बंदी,आयसीसीचा निर्णय

मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे अफगाणिस्तानचा स्फोटक फलंदाज इंशानुल्लाह जनातवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 7 ऑगस्ट रोजी हा निर्णय घेतला. याशिवाय बोर्ड आणखी तीन क्रिकेटपटूंची चौकशी करत आहे. 

अफगाणिस्तानच्या फलन्दाज इंशानुल्लाह जनतावर मॅच फिक्सिंगचा आरोप असून त्याच्यावर कारवाई करत आयसीसीने त्याच्यावर पाच वर्षाची बंदी घातली आहे. हा खेळाडू अफगाणिस्तानकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, काबूल प्रीमियर लीगच्या दुसऱ्या आवृत्तीत खेळाडू भ्रष्टाचारविरोधी संहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी दोषी आढळला असून त्याच्यावर बंदी घातली आहे. आयसीसी आणखी तीन क्रिकेटपटूंची चौकशी करत आहे. अद्याप त्यांची नावे उघड आलेली नाही. या बाबत बोर्ड लवकरच निर्णय घेईल. असे सांगण्यात येत आहे. 
Edited by - Priya Dixit