बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 30 जानेवारी 2023 (09:33 IST)

IND vs NZ 2nd T20 :भारताने न्यूझीलंडचा सहा गडी राखून पराभव केला

India vs New Zealand (IND vs NZ) 2nd T20 :भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने पहिला टी-20 सामना 21 धावांनी गमावला, पण दुसरा सामना सहा विकेटने जिंकून मालिकेत1-1 अशी बरोबरी साधली. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत आठ गडी गमावून 99 धावा केल्या. भारताने 100 धावांचे लक्ष्य एका चेंडू राखून पूर्ण केले.
 
भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा सहा गडी राखून पराभव केला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत आठ गडी गमावून 99 धावा केल्या. भारताविरुद्ध टी-20 मध्‍ये किवी संघाची ही सर्वात कमी धावसंख्या होती. प्रत्युत्तरात टीम इंडियाने एक चेंडू बाकी असताना चार गडी गमावून लक्ष्य गाठले. सूर्यकुमार यादवने भारतीय डावातील 20व्या षटकातील पाचव्या चेंडूवर चौकार मारून सामना जिंकला. या विजयासह तीन सामन्यांच्या T20I मालिकेत आता 1-1 अशी बरोबरी झाली आहे. निर्णायक सामना 1 फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
 
Edited By - Priya Dixit