मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 20 ऑगस्ट 2022 (12:35 IST)

IND vs ZIM:टीम इंडियाचे लक्ष झिम्बाब्वेविरुद्ध 8 वी मालिका जिंकण्याचे

IND vs ZIM :भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (20 ऑगस्ट) सामना हरारे येथील सुपर स्पोर्ट्स क्लब मैदानावर होणार आहे.  सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 12.45 वाजता होणार. टीम इंडियाने गुरुवारी पहिला एकदिवसीय सामना 10 गडी राखून जिंकला. शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी नाबाद 192 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला सहज विजय मिळवून दिला. आता दुसऱ्या वनडेत टीम इंडियाचे  लक्ष  आणखी एका विजयाकडे असेल.
 
जर भारतीय संघाने हा सामना जिंकला तर ते मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेईल. या सामन्यात सर्वांच्या नजरा कर्णधार केएल राहुलवर असतील. दुखापतीमुळे राहुलला आयपीएलपासून व्यावसायिक क्रिकेट खेळता आलेले नाही. त्याची आशिया कप संघात निवड झाली आहे. अशा स्थितीत राहुलला आशिया कपमधून फलंदाजीची संधी मिळावी, अशी काळजीवाहू प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांची इच्छा आहे. यामुळे त्यांना पुन्हा रुळावर येण्याची संधी मिळेल. 
 
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. भारतीय कर्णधार केएल राहुलने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झिम्बाब्वेसाठी ही शेवटची संधी आहे, कारण आजचा सामना जरी हरला तरी ते मालिकेत 0-2 ने पिछाडीवर असतील आणि भारताकडे अजेय आघाडी असेल.
 
भारताची प्लेइंग इलेव्हन- दीपक चहरच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी मिळाली आहे. प्लेइंग इलेव्हन: शिखर धवन, शुभमन गिल, इशान किशन, केएल राहुल (क), दीपक हुडा, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, प्रशांत कृष्णा, मोहम्मद सिराज.
 
झिम्बाब्वे: तडीवंशे मारुमणी, इनोसंट कैया, शॉन विल्यम्स, वेस्ली मधेवेरे, सिकंदर रझा, रेगिस चकाबवा (c/w), रायन बर्ल, ल्यूक जोंगवे, ब्रॅड इव्हान्स, व्हिक्टर न्युची, रिचर्ड नगारावा