शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: दुबई , मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (12:58 IST)

पंतला आयसीसीकडून मानाचा पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 2021 पासून महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू असा नवा पुरस्कार सुरू केला आहे आणि पहिल्याच पुरस्काराचा मानकरी ठरला आहे तो भारताचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंत.
 
जानेवारी महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळत होता. या मालिकेत  पंतने दोन डावांत संस्मरणीय खेळी केली. तिसर्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने 97 धावांची धडाकेबाज खेळी केली होती. तर चौथ्या सामन्यात त्याने नाबाद 89 धावा करत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या याच खेळीमुळे त्याला जानेवारी 2021 मधील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
 
पंतने जानेवारी महिन्यात 4 डावांत 245 धावा केल्या. 81.66 च्या सरासरीने त्याने धावा कुटल्या. त्याने 4 झेल टिपले. तसेच एका सामन्यात सामनावीराचा किताबही मिळवला. त्यामुळे आयसीसीच्या मतदान समितीने आणि चाहत्यांनी मिळून या पुरस्कारासाठी पंतची निवड  केली.