बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 12 मे 2018 (16:51 IST)

राजस्थानची टीम गुलाबी जर्सी घालून उतरली मैदानात

चेन्नईविरुद्धच्या रोमहर्षक मॅचमध्ये राजस्थानचा ४ विकेटनं विजय झाला. या मॅचमध्ये राजस्थानची टीम गुलाबी जर्सी घालून मैदानात उतरली होती. कॅन्सरबद्दल जागृकता निर्माण करण्यासाठी राजस्थानच्या टीमनं हा सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला होता. या गुलाबी जर्सीमुळे राजस्थानचं नशीब मात्र चांगलंच फळफळलं आणि त्यांनी तगड्या अशा चेन्नईचा पराभव केला. 
 
चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर राजस्थाननं प्ले ऑफमध्ये क्वालिफाय होण्याचं आव्हान अजूनही कायम ठेवलं आहे. ११ मॅचमध्ये ५ विजयासह राजस्थानच्या टीमकडे १० पॉईंट्स आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थान सहाव्या क्रमांकावर आहे. प्ले ऑफमध्ये क्वालिफाय होण्यासाठी राजस्थानला उरलेल्या तिन्ही मॅच जिंकाव्या लागणार आहेत. या विजयाबरोबरच राजस्थानला इतर टीमच्या कामगिरीवरही अवलंबून राहावं लागणार आहे. राजस्थानबरोबरच मुंबई आणि कोलकात्यानंही ११ पैकी ५ मॅच जिंकल्या आहेत.